रत्नागिरी | शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राऊंड असतात. मातोश्रीवरून बटण दाबलं की रस्त्यावर आलो. शिवसेना सगळं बटण दाबून करते. मातोश्रीची सुरक्षा कडक केली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावल्यात, असा मिश्कील टोला भाजप नेते नारायण राणेंनी लगावला.
मी हे करतो ते करतो असं मुख्यमंत्री सांगतात. एकीकडे वीजबिलं माफ केली जाईल असं सांगायचं आणि दुसरीकडे वीज तोडायची हा ग्राहकांवर अन्याय आहे. या विरोधात भाजप आवाज उठवेल, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पिस्तूल हातात असणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यावरून राणेंनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.
शिवसेनेचे हे कार्य आहे. शिवसैनिकांना हायवेवर बाकी काही काम राहिलं नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लक्ष द्यावं, असं नारायण राणे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक…! सुशांतसिंग राजपूतच्या भावाला भर चौकात गोळ्या घातल्या!
शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर- नरेंद्र मोदी
संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत!
‘मी आता त्यांच्यापुढे डोकं फोडून घेऊ का?’; अजित पवार भडकले