बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणे-ठाकरे मंचावर, संधी साधून सुभाष देसाईंनीही केला राणेंवर प्रहार!

सिंधुदुर्ग | चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा पार पडत असताना राजकीय युद्ध सुद्धा जोरदार रंगलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्बल 16 वर्षानंतर एकाच व्यासपिठावर आल्यानं राजकीय शितयुद्ध पहायला मिळालं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सुद्धा नारायण राणे यांना चांगलंच घेरल्याचं पहायला मिळालं आहे.

चिपी विमानतळ सुरू होण्याच्या अगोदर या विमानतळाचं श्रेय घेण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली होती. आजच्या कार्यक्रमात राणे आणि ठाकरे यांच्यातील जूगलबंदी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. सुभाष देसाई यांनीही याप्रसंगी राणे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

काही जणांनी विमानतळ सुरू व्हायला विलंब लागल्याची टीका केली. शेवटी पायगुण लागत असतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगुण चांगला आहे, म्हणून विमानतळ सुरू झाल्याचा टोला देसाई यांनी राणे पितापुत्रांना लगावला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सकाळी शिवसेनेमुळे या विमानतळाला सुरू होण्यास विलंब लागल्याचं वक्तव्य केलं होतं. राणे यांच्या या वक्तव्याचा सुभाष देसाई संधीसाधून चांगलाच समाचार घेतला आहे.

थोडक्यात बातम्या 

“लघू-सूक्ष्म का असेना तुमच्याकडे मोठं खातं”; उद्धव ठाकरेंकडून राणेंना कानपिचक्या

“खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी बाहेर काढलं होतं”; राणेंच्या ‘त्या’ वाक्याचा फडशा!

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला”

नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमोर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More