महाराष्ट्र मुंबई

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…- नारायण राणे

मुंबई | गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.

कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेलं चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचं आराध्य दैवत आहे, असं नारायण राणेंनी म्हटलंय.

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांच्यानंतर नारायण राणे यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली. लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी

जिओमीट हुबेहुब झूमसारखं; झूम जिओला कोर्टात खेचणार?

पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउन, अजित पवारांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या