बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेने राज्यभरात आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी आम्ही भाजप नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्याचं समर्थन करत नाही, पण भाजप एक पक्ष म्हणून नारायण राणे यांच्या पाठिशी आहे, असं म्हटलंय.

एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करु शकत नाही. एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठिशी उभा राहील आणि राहतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. मात्र संपूर्ण भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचं म्हणत आम्ही राडेबाज नाही. आम्ही राडा करत नाही. मात्र भाजप कार्यालयांवर हल्ला झाला तर आंदोलन करू. कायद्याचं राज्य असलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, नारायण राणेंनी चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत घेत या वादावर भाष्य केलं आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी केली जात आहे, असं राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नारायण राणेंना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही- भास्कर जाधव

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More