बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेच्या दोन्ही पोरांना मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार राणेंवर टीका करताना दिसत आहे. तर निलेश राणे आणि नितेश राणे देखील शिवसेनेवर आग ओकताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेनेच्या एका नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

नारायण राणेसोबत, कोंबडी चोरासोबत आपला वाद सुरु आहे. उद्धव साहेबांबद्दल कोणीही काहीही बोलल तर सहन करणारे आम्ही शिवसैनिक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणी चुकीचं बोलत तर आम्ही सहन करणार नाहीत, असा इशारा बीडचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे.

आमच्यात तेवढा दम आहे, मी इथे सर्वांसमोर सांगतो, येत्या काळात नारायण राणेच्या दोन्ही पोरांना मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य देखील गणेश वरेकर यांनी केलं आहे. नारायण राणेंसोबत लढायची तयारी आहे. साहेब आमचं दैवत आहेत. आमच्या दैवताला कोणी काही बोललेलं आम्हाला सहन होणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, आम्हाला कार्यक्रम करण्याची सवय आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर निलेश राणे यांनी आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा थेट इशारा दिला होता.

थोडक्यात बातम्या-

राज्यात दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत घट; वाचा आजची आकडेवारी

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा एक डोस देखील प्रभावी; आयसीएमआरचा दावा 

दिलासादायक! पुण्याच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट, पाहा आकडेवारी

काबूल हल्ल्यात भारतीय कनेक्शन?; आली ही धक्कादायक माहिती समोर

‘… अन्यथा जेलभरो आंदोलन करू’; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला अल्टीमेटम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More