पुणे महाराष्ट्र

लेखक रंगनाथ पठारेंच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीचं उद्या प्रकाशन

Loading...

पुणे |  ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीचं प्रकाशन उद्या पुण्यात पार पडत आहे. शब्दालय प्रकाशनाने त्यांचं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

पुण्यात टिळक रस्त्यावरच्या पद्ममजा सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, ज्येष्ठ लेखक राजन गवस, ज्येष्ठ लेखक राजन खान आणि नाट्य अभिनेते दिपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थित पठारे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.

Loading...

आपला भोवताल मानवी वृत्ती प्रवृत्ती नातेसंबंधातील अनाकलनीय गुंतागुंत अशा अनेक गोष्टींचे 700 ते 800 वर्षाच्या दीर्घ कालपटाच्या पार्श्वभूमीवर माणासांच्या नजरेतून केलेले अवलोकन, असा या पुस्तकाचा गाभा म्हणता येईल.

दरम्यान, साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे.

Loading...
Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या