राणी मुखर्जीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?; म्हणाली,”लग्नानंतर प्रेम..”

Rani Mukerji Big Statement on Relationship

Rani Mukerji | नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी बऱ्याच दिवसांपासून बॉलीवुडमध्ये सक्रिय नाही. मात्र, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ती हजेरी लावत असते. राणी मुखर्जीने चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केलं.त्यांना एक मुलगी देखील आहे. अशात राणी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

एका मुलाखतीत राणी हिने मोठं वक्तव्य केलं होतं. लग्नानंतर प्रेम संपतं असं अभिनेत्री म्हणाली होती. आज 21 मे रोजी तिचा नवरा अदित्य यांचा वाढदिवस असल्यामुळे राणी हिने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

काय म्हणाली राणी मुखर्जी?

राणीने मुलाखतीमध्ये आपल्या नवऱ्याचं भरभरून कौतुक केलं.”आदित्य एक उत्तम पुरुष आहे. त्याला लोकांचा आदर करणं माहिती आहे. मी अशा घरात मोठी झाली आहे, जेथे लोकांचा आदर, सन्मान कसा करायचा हे मला शिकवलं आहे. पहिल्यांदा जेव्हा आदित्य याला पाहिलं तेव्हा त्याची वागणूक मला आवडली. टीममध्ये त्याची लिडरशीप पाहून मी आकर्षित झाली.”, असा खुलासा राणीने केला.

पुढे ती म्हणाली की, “पती-पत्नीच्या नात्यात सुरुवातील तुम्ही एकमेकांकडे आकर्षित होता. पण लग्नानंतर प्रेम कमी होतं. पण एकमेकांसाठी मनात असलेला आदर कमी व्हायला नको. तुमच्या नात्यात कायम आदर आणि सन्मान असायलाच हवा.”, असं राणी मुलाखतीमध्ये म्हणाली. तिचं हे विधान आता चर्चेत आलंय. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

“..तर संपूर्ण आयुष्य खराब होईल”

राणीने रिलेशनशिपबद्दल अजून काही गोष्टी सांगितल्या. “अनेक महिला अशा आहेत, ज्या फक्त लग्न केलं आहे म्हणून आयुष्य जगत आहेत. पण त्या कधीच स्वतःचे विचार मांडू शकत नाहीत. जर तुम्ही चुकीच्या कारणामुळे लग्न करत असाल तर संपूर्ण आयुष्य खराब होईल.”,असंही राणी (Rani Mukerji) म्हणाली.

दरम्यान, राणी मुखर्जी आणि आदित्य या दोघांनी 2014 मध्ये लग्न करत संसार थाटला. राणीने आपल्या मुलीला कायमच प्रसिद्धीपासून दूर ठेवलं आहे. मात्र, जामनगर येथे झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये राणीने (Rani Mukerji) मुलीसोबत हजेरी लावली होती. तेव्हा आदिरा पहिल्यांदा सर्वांसमोर आली होती.

News Title- Rani Mukerji Big Statement on Relationship

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

पोर्शे कारसंदर्भात धक्कादायक माहिती समोर; वडिलांनीच मला…

आली रे आली आता तुझी बारी आली; ‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल

आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .