मॅडम जी गो ईझी.., राणी मुखर्जीच्या ‘हिचकीचं गाणं प्रदर्शित

मुंबई | अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ चित्रपटाचं गाणं प्रदर्शित झालंय. या गाण्याचे बोल ‘मॅडमजी गो ईझी’ असे आहे.

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे राणी मुखर्जीने या गाण्याचं प्रदर्शन पुढे ढकललं होतं. मात्र 2 मार्चला हे गाणं प्रदर्शित झालं.

जसलीन राॅयल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून बेनी दयाल आणि डेविड क्लिटाॅन यांनी स्वरबद्ध केलं आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या भूमिकेचं नाव नैना माथूर आहे. येत्या 23 मार्चला राणीचा ‘हिचकी’ प्रदर्शित होणार आहे.