…नाहीतर तीन वर्षातच राजकारण सोडून देईन- रजनीकांत

चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केलीय, मात्र लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही तर तीन वर्षातच राजकारण सोडून देईन, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलंय. 

रजनीकांत राजकारणात प्रवेश करत आहेत तर मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल, असं कमल हसन यांनी म्हटलंय. त्यामुळे रजनीकांत आणि कमल हसन मांडीला मांडी लावून राजकारणात प्रवेश करणार का? हा प्रश्नच आहे. 

दरम्यान, रजनीकांत यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली असली तरी अद्याप नाव जाहीर केलेलं नाही. त्यांच्या या घोषणेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.