कोलंबो | श्रीलंकेतील (Sri Lanka) महागाई आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीवरुन मोठा जनक्षोभ उसळला होता. देशभरातील नागरिक रस्त्यांवर उतरुन सरकारला जाब विचारत होते. संतप्त नागरीकांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान यावर कब्जा मिळविला होता. त्यानंतर अटकेला घाबरुन राष्ट्रपतींनी राजीनामा देत देशातून मालदिवला पलायन केले. त्यानंतर तत्कालिन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्याकडे अंतरिम राष्ट्रपतींची सूत्रे आली होती. आणि त्यांनी देशात आणिबाणी आणि जमावबंदीचे आदेश दिले होते.
देशात पुन्हा राष्ट्रपती पदासाठी निवडणूका घेण्यात आल्या. त्यात रानिल विक्रमसिंघे विजयी झाले. त्यांनी दुल्लास अलाहपेरुमा (Dullas Alahapperuma) यांचा पराभव केला. अलाहपेरुमा हे विक्रमसिंघे यांच्या विरोधात बंडखोर नेत्यांकडून उमेदवार होते. एसएलपीपी (SLPP) पक्षाने त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली होती.
सत्ताधारी पक्ष एसएलपीपीच्या माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या गटाकडून विक्रमसिंघे यांनी पाठींबा मिळाला होता त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक जिंकल्यानंतर विक्रमसिंघे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाची घोषणा केली. विक्रमसिंघे म्हणाले, मी विरोधी पक्षनेते, विरोधी पक्ष आणि संघटना तसेच माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) आणि मैथ्रिपला सिरीसेना (Maithripala Sirisena) यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन आणि विनंती करतो.
रानिल विक्रमसिंघे यांनी या निवडणुकीत 132 मते व अलाहपेरुमा यांना 82 मते मिळाली. तर जेव्हिपी या डाव्या पक्षाच्या उमेदवार अनुरा कुमारा दिसनायके (Anura Kumara Dissanayake) यांना फक्त तीन मते पडली. ही सर्व मतदान प्रक्रिया श्रीलंकेच्या संसद वाहिनीवर थेट प्रेक्षेपनात नागरिकांना दाखविण्यात आली. जेनेकरून या निवडणूका पारदर्शक झाल्याचे जनतेला कळावे.
थोडक्यात बातम्या –
शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला
मुळशी धरण परिसरात जमिनीला भेगा, नागरिक भयभीत
‘…तेव्हा फडणवीस रडायला लागले होते’, नाना पाटोलेंची टोलेबाजी
‘घोटाळे करायचे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…’,आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका
Comments are closed.