बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

कोलंबो | श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आणि माणूस माणसांत राहिले नाही. संतप्त नागरीक रस्त्यांवर उतरले. नागरीकांनी रस्त्यावर उतरत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे राजीनामे मागितले. अटकेटच्या भितीमुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapakshe) देशातून परागंदा झाले. त्यानंतर लंकेच्या घटनेनुसार पंतप्रधान रानील विक्रमसिंघे (Ranil Wikramsinghe) देशाचे अंतरीम राष्ट्रपती झाले. त्यांनी शुक्रवारी पदभार सांभाळला.

राष्ट्रपतींचा पदभार सांभाळल्यानंतर विक्रमसिंघे यांंनी देशाला उद्देशून भाषण दिले. देशात कोणतीही असंविधानिक घटना मी होऊ देणार नाही असे विक्रमसिंघे म्हणाले. लोकसभेचे अध्यक्ष यापा अबेवारदेना (Yapa Aberbardena) यांना माजी परागंदा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अंतरीम राष्ट्रपती म्हणून पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना शपथ दिली.

मी राज्यघटनेच्याबाहेर कोणतेही काम करत नाही. मी घटनाबाह्य आणि असंविधानिक गोष्टी माझ्या देशात खपवून घेणार नाही. जर कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली तर त्याचे परीणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागल्याने त्याचे परीणाम आपल्या वीज, पाणी पुरवठा आणि अन्नधान्य पुरवठा या गोष्टींवर होणार आहे, असं आवाहन विक्रमसिंघे यांनी संतप्त देशवासियांना केलं.

लोकसभा अध्यक्षांनी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन राष्ट्रपती 20 जुलै रोजी संसदिय निवडणूकीतून निवडले जातील असं सांगितलं. यासाठी शनिवारपासून संसदेचे सत्र सुरु होत आहे. राष्ट्रपतींच्या पदासाठी विक्रमसिंघे यांच्यासह विरोधीपक्ष नेते साजिथ प्रेमदासा, माजी लष्करप्रमुख साराथ फोनेस्का आणि माजी मंत्री दुल्लास अल्हापेरुमा लढतेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

‘कॉफी विथ करण 7’ मध्ये जान्हवी कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली…

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; नवं गाणं लवकरच येणार

“…तर मी शरद पवारांच्या घरी जाऊन माफी मागून दिलगीरी व्यक्त करेन, ते माझ्या गुरुसमान”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More