देश

‘न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणं म्हणजे…’; रंजन गोगोई यांचं धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली | भारतीय न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. तसेच न्यायालयात न्याय मिळणं दुरापास्त झालं आहे, असं वक्तव्य माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गोगोईंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

मला विचारलं तर कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात अजिबात जाणार नाही. न्यायालयात जाणं म्हणजे पश्चाताप करून घेण्यासारखं आहे. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.

न्यायाधीश नेमले जातात, तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. निकाल कसा लिहावा, हे शिकवलं जात नाही. न्यायालयीन कामकाजात कसं वागावं हे शिकवलं जात नाही, अशी खंत रंजन गोगोई यांनी व्यक्त केली आहे.

सरकारी अधिकारी नेमतात तशी न्यायाधीशांची नेमणूक होत नाही. कामासाठी योग्य व्यक्ती मिळणं महत्वाचं असतं. न्यायाधीशाची पूर्ण काळ वचनबद्धता असते. कामाचे तास निश्चित नसतात. रात्री 2 वाजता उठून आम्ही काम केलेलं आहे, असं रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माजी सरन्यायाधिश असलेल्या रंजन गोगोई यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. माजी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल- रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढोंगीजीवी- नाना पटोले

जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ

“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”

‘तिच्या वेदना पाहून मी…’; नवऱ्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नीला गिफ्ट केली किडणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या