Top News पुणे

पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली, 50 कोटी वाटून सत्ता मिळवली- रंजन तावरे

Loading...

बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणली. पण विरोधी सहकार बचाव पॅनलला हा निर्णय मान्य नाही. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर आणि दहशतीच्या बळावर निवढणूक जिंकल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे.

सत्तेच्या माध्यमातून अजित पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली आहे. या निवडणुकीत 50 कोटी वाटले असल्याचा आरोपही रंजन तावरे यांनी अजित पवारांवर केला आहे.

Loading...

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत सत्तेचा प्रचंड गैरवापर केला. तब्बल सहा दिवस उपमुख्यमंत्री बारामतीत होते. त्यांनी मतदारांना दमदाटी केली. कोणाला नोकरीवरून काढू, कोणाचं पाणी बंद करू, अशा धमक्या दिल्या असल्याचंही तावरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रंजित तावरे यांनी केलेल्या आरोपांवर अजून अजित पवारांची कोणतेही स्पष्टीकरण आलेली नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

माळेगाव निवडणुकीच्या 7 जागांचा निकाल जाहीर

दिल्लीत हिंसाचार उसळला; एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू

महत्वाच्या बातम्या-

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचं कामकाज तहकूब

तावरे गुरु-शिष्याला अजित पवारांचा शह, माळेगावची सत्ता खेचून आणली

डोनाल्ड ट्रम्प, मेलेनिया ट्रम्प आणि मोदींसोबत दिसणारी ही महिला आहे कोण?

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या