मुंढेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करावा!

नाशिक | महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा सन्मान करावा, अन्यथा यापुढे महासभा घेणार नाही, असा इशारा महापौर रंजना भानसी दिला आहे.

अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा सन्मान न केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, असा इशाराही त्यांनी तुकाराम मुंढेचं नाव न घेता दिला आहे. त्यामुळे महापौरांच्या या दुर्गावतारामुळे सगळ्याचेच धाबे दणाणले होते.

दरम्यान, भाजपच्यावतीने या अगोदर मुंढे यांच्या विरोधात अविश्वाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे ठराव मागे घेण्यात आला होता. मात्र आज पुन्हा सत्ताधारी भाजप आणि तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपच्या ‘या’ तीन प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास भाजपकडून बंदी!

-मुख्यमंत्रीसाहेब…हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स? धनंजय मुंडेंचा सवाल

-#MeTooमोहीमेमुळे पुरूषांनी महिलांवर आरोप केले तर काय होईल?- केंद्र मंत्र्यांची मुक्ताफळं

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!

-#MeToo | नाना-तनुश्रीचा वाद राखी सावंतला अटक होण्याची शक्यता?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या