बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामराजे बिनलग्नाची अवलाद; निवडून आल्यानंतर रणजितसिंहाची जहाल टीका

सातारा |  मी ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासा. मी नाईक निंबाळकरांची औलाद नाही, असं रामराजे सांगतात. मात्र त्यांच्या आईवडिलांचे तर लग्नही झाले नाही. रामराजे बिनलग्नाची अवलाद आहेत, अशी जहरी टीका माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या लग्नाचा दाखला दाखवावा… मी एक हजाराचे बक्षीस देईन… कारण रामराजे बिनलग्नाची अवलाद आहेत.. हा इतिहास आहे, असा घणाघात रणजितसिंह यांनी रामराजे यांच्यावर केला.

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर फलटणमध्ये आयोजित सभेत रामराजेंवर रणजितसिंहांनी कडाडून हल्लाबोल केला. फलटनमध्ये नवीन जीआर आलाय… इथली पापं इथेच फेडायची आहेत, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, रणजितसिंहांनी केलेल्या टीकेला रामराजे काय उत्तर देतात हे पाहणे महात्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून काँग्रेसचा राज्यात पराभव; अशोक चव्हाणांचा आरोप

-…म्हणून या मुस्लिम महिलेने तिच्या बाळाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले!

-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा नामंजूर

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला

-राहुल गांधींच्या ‘या’ कृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More