…तर खेळाडूंना मिळणार 1 कोटी अन् BMW कार; HCA ची मोठी घोषणा

Ranji Trophy | देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान खेळाडूंसमोर असते. रणजी ट्रॉफी ही स्पर्धा भारतातील युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 च्या प्लेट गटाच्या अंतिम सामन्यात हैदराबादने मेघालयचा 5 गडी राखून पराभव केला. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाकडून के नितेश रेड्डी आणि प्रज्ञा रेड्डी यांनी शतके झळकावली.

अशातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी 3 वर्षात हैदराबादच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू कार देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

HCA ची मोठी घोषणा

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी पुढील तीन वर्षात रणजी ट्रॉफी जिंकल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये रोख आणि 1 बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली जाईल, असे सांगितले.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी ही घोषणा करताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे. हैदराबादचे नेतृत्व तिलक वर्मा करत आहे. त्याच्या संघाने अलीकडेच प्लेट गटाच्या अंतिम फेरीत मेघालयचा पराभव केला आहे.

 

Ranji Trophy मध्ये प्रथमच एवढे बक्षीस

हैदराबादविरूद्ध मेघालयने पहिल्या डावात 304 धावा केल्या. यादरम्यान अक्षय चौधरीने अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात संघाने 243 धावा केल्या. यादरम्यान राज बिस्वाने शतक झळकावले. त्याने 114 चेंडूंचा सामना करत 100 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने पहिल्या डावात 350 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 203 धावा करत सामना जिंकला. यादरम्यान तिलकने अर्धशतक झळकावले.

खरं तर आतापर्यंत इंडियन प्रीमिअर लीगमधील बक्षिसांबाबत बरीच चर्चा झाली आहे. आयपीएलमध्ये संघ खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतात. मात्र आता रणजीमधील एवढी मोठी घोषणा चर्चेत आली आहे. एवढ्या मोठ्या घोषणेनंतर HCA चे अध्यक्ष जगन मोहन राव प्रसिद्धीच्या झोतात आले.

News Title- Hyderabad cricket association chief jagan mohan rao promises in BMW per player, Rs 1 crore cash prize to Hyderabad team Ranji title win in next 3 years
महत्त्वाच्या बातम्या –

बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

‘या’ SIP मुळे तुम्हीही व्हाल मालामाल, जाणून घ्या अधिक