पुणे महाराष्ट्र

मूर्ती लहान, कीर्ति महान! ‘स्वाभिमानी’च्या प्रवक्तेपदी रणजीत बागल यांची नियुक्ती

पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत शिलेदार अशी ओळख असलेल्या आणि अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेल्या रणजीत बागल यांना स्वाभिमानीने मोठी संधी दिली आहे. पक्षाच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अत्यंत कमी वयात रणजीत बागल संघटनेच्या कामात जोडले गेले. आपल्या धारदार वक्तृत्वामुळे आणि माणसं जोडण्याच्या कलेमुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले, मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची संघटनेसोबत असलेली निष्ठा, याच गुणांमुळे त्यांना प्रवक्तेपदाची संधी देण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वत: रणजीत बागल यांना निवडीचं पत्र दिलं. स्वाभिमानीची बाजू आता अधिक भक्कमपणे मांडली जाईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला?- देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये- देवेंद्र फडणवीस

राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण- देवेंद्र फडणवीस

“कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या