Top News राजकारण

“विरोधी पक्षनेत्यांनी आपले वजन वापरुन राज्याला विशेष मदत पॅकेज मिळवून द्यावं”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी ही मदत अपुरी असल्याचं म्हटलं आहे.

रणजित बागल म्हणाले, “अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली याचं आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने स्वागतच करतो. मात्र ही मदत अपुरी आहे एवढ्याने शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही. आधीच कोरोनामुळे फळे आणि भाजीपाला यामुळे तोटा सहन करावा लागला आणि नंतरची अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय.”

रणजीत पुढे म्हणाले, “राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा. राज्यातील विरोधीपक्ष नेत्यांचं केंद्रामध्ये वजन आहे. तेव्हा राज्यातील विरोधी पक्षाने आणि विरोधीपक्षनेत्यांनी केंद्राकडे विशेष मदतीच्या पॅकेजची मागणी करावी. आपलं वजन वापरून ती मदत शासनास द्यावी, त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.”

“राजू शेट्टी साहेबांनी आपातग्रस्त भागाचा दौरा केला असता तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे. या मदतीने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाही. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने हेवेदावे बाजूला सारून समन्वय साधत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

नितिशकुमारांच्या योजनेमुळे बिहारमधील कोरोनाचा प्रादुर्भाव टळला- नरेंद्र मोदी

धूम स्टाईलप्रमाणे खासदार उदयनराजेंनी मारला बाईकने फेरफटका!

वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या