Top News राजकारण

“गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं, हे आपण सिद्ध करुन दाखवलं”

पुणे | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं आज निधन झालंय. यावर स्वाभिमानी युवाचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी प्रतिक्रिया दिलीये.

रणजीत बागल म्हणतात, “हे निखळ हास्य पुन्हा दिसणे नाही.. गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं हे आपण सिध्द करून दाखवलं होतं.. नाना केवळ बुध्दिचातुर्याच्या जोरावर आपण भल्याभल्या दिग्गजांना आस्मान दाखवलं होतं.”

ते पुढे म्हणतात, “एखाद्या लोप्रतिनीधीवर जनतेचं किती प्रेम असतं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नाना आपण होतात.. “बादलकोटच्या टोकापासुन हुलजंतीच्या कर्नाटकच्या सिमेवरील टोकापर्यंत अमाप असा जनसंपर्क” आणि “हा माणुस आपला घरचाच कुणीतरी आहे” ही रूजलेली भावना तुम्ही अशक्य ते शक्य केलं होतं नाना.”

“यंदाची विधानसभा आम्ही तुमच्यासोबत अनुभवली तुमचं नियोजन किती सुक्ष्म आणि कर्रेक्ट होतं हे पदोपदी जाणवत होतं.. निवडणुकीच्या दहा दिवस आधी तुम्ही आम्हाला सरकोलीच्या घरी सांगितलेलं विजयाचं गणित तंतोतंत खरं ठरलं होतं. इतकी घट्ट जनतेशी नाळ. नाना आपण आमच्या सर्वांसाठी एक वटवृक्ष होतात. आपल्या पाठबळाची आता खरी गरज होती…नियती इतकी क्रुर होईल वाटलं नव्हतं.”

शब्द सुचत नाहीत.. नाना तुमची पाठीवर पडलेली थाप आम्हाला दहा हत्तींचं बळ द्यायची.. जेव्हा भेटाल तेव्हा “लगानु,पोरांनु आपलं सगळं येवस्तित व्होत असतंय,पवारसायेब हायतं तवर तुमी काय काळजी करू नगा” असं मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होतात..नाना तुम्ही तालुक्याचा स्वाभिमान होतात.. आता आधार मिळनार नाही आशिर्वाद रूपी सावली राहुद्या.. भावपूर्ण श्रध्दांजली नाना.

महत्वाच्या बातम्या-

“मतदारसंघाच्या विकासासाठी भालके नेहमी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ

“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”

100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या