बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बियाणे, युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का?- रणजित बागल

मुंबई | राज्यभरामध्ये सध्या सर्वत्र शेतकर्‍यांची पेरणीची लगबग सुरू आहे. सध्या रासायनिक खते आणि बी बियाणे यांची प्रचंड गरज शेतकऱ्यांना असताना व्यापारी व खतदुकानदार यांच्याकडून साठेबाजी करून खते व बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार खते व बियाणे मिळेनाशी झाली आहेत. यावर आता शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बियाणे, युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी केला आहे.

याबाबत बोलताना रणजित बागल म्हणाले की, काही व्यापारी आणि खतदुकानदार लिंकीगद्वारे युरिया विक्री करत आहेत. साठेबाजी आणि त्यामुळे होत असलेली खते आणि बियाणे यांची कृत्रिम टंचाई यावर राज्याचा कृषी विभाग मात्र कोणतीही पावले उचलायला तयार नाही. शासनाचे भरारी पथक म्हणजे पांढरा हत्ती प्रमाणे सुस्त बनला आहे, अशी जहरी देखील टीका बागल यांनी केली.

याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, कृषीविभागाचे अधिकारी आणि व्यापारी यांच्या छुप्या युतीमुळे आज हंगाम सुरू असताना देखील शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळेनात ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यांसोबत आदरणीय राजु शेट्टी साहेबांच्या आक्रमक विचारांसह लढा उभा करेल. अशा साठेबाजांवर, व्यापारी व दलालांवर राज्य शासनाने लवकरात लवकर कडक पाऊले उचलावीत अन्यथा स्वाभिमानीच्या वतिने आंदोलन छेडण्यात येईल, असा सरकारला इशारा देखील बागल यांनी दिला.

थोडक्यात बातम्या- 

ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे- अशिष शेलार

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More