Top News महाराष्ट्र मुंबई

“शेलारांना भाजपमध्ये सध्या काय किंमत आहे हा संशोधनाचा विषय”

मुंबई | स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी शेलारांवर निशाणा साधला आहे.

शेलारांना भाजपामध्ये सध्या काय किंमत आहे हा संशोधनाचा विषय असून हेच शेलार ज्यांना भाजपमध्ये किंमत नसल्याने विजनवासात असल्याचं रणजित बागल यांनी म्हटलं आहे.

शेलारांचं भाजपमध्ये एकेकाळी चांगलं वजन होतं मात्र भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळांमुळे त्यांना कोण दखलपात्र करत नाही. त्यामुळे शेट्टींवर टीका केल्यास तरी पक्षश्रेष्ठी आपल्याला काहीतरी देतील असा आशावाद बाळगून शेलार आहेत.या विवंचनेतुनचं ते असे वायफळ बडबड करत सुटले असल्याचंही बागल यांनी म्हटलं आहे. याआधी राजू शेट्टींनीसुद्धा शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, सत्तासुंदरी हातची गेल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदाससारखी झाली असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट फक्त 21 हजार 900 कोटी, तर मोदींच्या काळात…”

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही, शेतकऱ्यांना पैसे नकोत न्याय हवाय- सुप्रिया सुळे

पुण्यात मनसेचं खळखट्याक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन फुटलं

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या