Top News

‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसले यांना कोरोनाची लागण!

पंढरपूर | ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे. डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

माझ्यात काही लक्षणे दिसून आल्यानंतर मी कोरोना चाचणी करून घेतली, ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन डिसले गुरुजींनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुंबईतल्या अनेक प्रसार माध्यमांनी डिसले गुरुजींच्या मुलाखती घेतल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरण आदित्य ठाकरे, राज ठाकरेंची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या-

‘कृषी कायदा रद्द करा’; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आहे- राहुल गांधी

मोदी सरकारचा ‘तो’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी मागणीवर ठाम

पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

शेतकऱ्यांसाठी फ्री डिझेल; ‘या’ महामार्गावर सुरु आहे खास पुरवठा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या