बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना अमेरिकेकडून ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर

सोलापूर | युनोस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांना जाहीर करण्यात आला होता. रणजितसिंह डिसले गुरूजींची शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घ्यावी लागली. त्यातच आता अमेरिकेकडून (America) डिसले गुरूजींना प्रतिष्ठित समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती (Fullbright scholarship) जाहीर करण्यात आली आहे.

पीस इन एज्युकेशन (Peace in Education) या विषयामध्ये अमेरिकेत संशोधन करण्यासाठी रणजितसिंह डिसले यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगभरातील प्रतिभावंत शिक्षकांना एकत्रित आणून शैक्षणिक संशोधन करण्याची संधी दिली जाते. जगातील अशांत  देशांमध्ये भारत-पाकिस्तान, इराण-इराक, अमेरिका-उत्तर कोरिया एकमेकांविरोधात द्वेष भावना उत्पन्न होत असल्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा उपक्रम हाती घेतला. अहिंसेच्या विचाराच्या प्रचार प्रसाराचं काम ते करत आहेत. याच विषयावर संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असं डिसले गुरूजींनी सांगितलं आहे.

दरम्यान, 2009 साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या परितेवाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रणजितसिंह डिसले रूजू झाले होते. त्यानंतर नाविन्यपुर्ण उपक्रम आणि करत ते जगभरातील 50 इनोव्हेटीव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान झाले. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटीश कौन्सिल, प्लीपग्रीड, प्लिकेर्स यांसारख्या आंतराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. आता जगातील सर्वोत्तम विद्यापीठात संशोधन करण्याची संधी डिसले गुरूजींना मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘बाबा नको जाऊ दूर…’,वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवची भावूक पोस्ट

बच्चू कडू वादाच्या भोवऱ्यात! वंचितकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

“साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला, पण पावसाला काय माहिती साहेब फक्त…”

पाकिस्तानची जगभर नाचक्की! ट्विट करत खुद्द अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल

“कोण राहुल गांधी?, मी त्यांना ओळखत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More