बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आंडू पांडूंनी माझा नाद करू नये”; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

सातारा | सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. भाजपकडून महाविकास आघाडीवर जोरादार टीका करण्यात येत आहे. भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे.

शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समोर मी हरलो नाही तर मग इतर आंडू पांडूंनी माझा नाद करू नये, असं वक्तव्य रणजीतसिंह यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकार मला मुद्दाम त्रास देत आहे, असंही रणजीतसिंह म्हणाले आहेत.

फलटणचे उद्योजक दिंगबर आगवणे यांनी रणजीतसिंह यांच्याविरोधात उपोषण सुरू केल्यानं वाद वाढला आहे. लाखो लोकांनी मला निवडून दिलं आहे, दोन पिढ्यांचा संघर्ष करून इथं आलो आहे, असंही रणजीतसिंह म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकार मला आणि आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील रणजितसिंह यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! 10वी नापास देखील करू शकतात अर्ज

डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

“महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आता बॅगा भरून ठेवाव्यात”

डिजीटल माध्यमासाठीचा पत्रकारिता पुरस्कार ‘थोडक्यात’ला; कृष्णा वर्पेंचा सन्मान

कोरोनाच्या स्टेल्थ व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More