राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

मुंबई |  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीचा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोमवारी (काल) रात्री उशिरापर्यंत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपकडून माढ्यातून लोकसभा लढणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे

-अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत