सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली! पाकिस्तानही आपल्या पुढे

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्राच्या ‘Worlds Happiest Countries Report’ नुसार भारताचं स्थान घसरलं आहे. भारताची 140 व्या स्थानावर घसरण झाली आहे. 

156 देशांच्या या यादीत नेहमीप्रमाणे फिनलँड सर्वात आनंदी देशांच्या यादीत यावर्षीही अव्वल क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. 

भारताचीही रँक घसरली आहे. 2018 मध्ये भारत या यादीत 133 व्या क्रमांकावर होता, तर यावेळी 140 वा क्रमांक आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राची ही सूची सहा निकषांवर निश्चित केली जाते. यामध्ये वय, देशातील लोकांचं स्वास्थ्य, सामाजिक सहकार्य, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या गोष्टींचा समावेश असतो. 

महत्वाच्या बातम्या-

-सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम

-समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

-लोकांना मूर्ख समजणे मोदींनी आता सोडावे- प्रियांका गांधी

-सुजय विखेंविरूद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लोकसभेच्या रिंगणात

“माझी पत्नी आणि मुलं कधीच लोकसभा, विधानसभा लढणार नाहीत”