मनोरंजन

स्टार होताच रानू मंडल बदलली; हात लावला म्हणून चाहतीवर भडकली

नवी दिल्ली |  एका गाण्याने रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्या एका चाहतीवर भडकताना दिसत आहेत. त्यामुळे स्टार होताच रानू बदलल्या आहेत ती काय असे प्रतिसाद उमटू लागले आहेत.

व्हिडिओमध्ये रानू सूपर मार्केटमध्ये खरेदी करताना दिसत आहेत. यावेळी एक महिला हात लावून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करते. यावर रानू महिलेवर भडकल्याचं दिसतंय. तु मला हात का लावत आहेस, असा प्रश्न रानू महिलेला विचारतात.

रानू यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. स्टार होताच रानू यांना गर्व चढला आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी रानूंची बाजू घेतली आहे.

दरम्यान, रानू मंडल पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपलं पोट भरायच्या. त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ एकाने सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हा पासून त्या प्रकाशझोतात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या