बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बचपन का प्यार’ गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर कोण कधी स्टार होईल याचा काही नेम नाही. गेल्या आठवड्यात एक शाळेचा गणवेश घातलेला मुलगा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या गाण्यातील मुलाचं नाव सहदेव असून तो त्याच्या गाण्यामुळे रातोरात स्टार झाला आहे. अशाच प्रकारे काही दिवसांमागे रानू मंडल ही रातोरात स्टार झाली होती.

आता रानु मंडल कुठं आहे?, काय करते? कोणाला माहित नाही. मात्र अशातच रानू मंडलने सहदेवचं बचपण का प्यार हे गाणं गायलं आहे. सेकर्ड अड्डा या नावानं असलेल्या इन्स्टाग्रामवर पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रानू मंडल हे गाणं गाताना दिसत आहे.

रानू मंडलने गायलेल्या या गाण्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाणं रेकॉर्ड करत आहे. रानू मंडल रातोरात झाल्या तेव्हा त्यांचं तेरी मेरी हे गाणं प्रसिद्ध झालं होतं.

दरम्यान, स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगर होण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा असाच होता.  प्रसिद्ध गायक हिमेश रेशमीया यानं आपल्या चित्रपटात राणू मंडल यांना गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू मंडल रातोरात स्टार झाल्या.

थोडक्यात बातम्या-

धोनीने 7 वाजता 29 मिनिटांनी का घेतली होती निवृत्ती?, समोर आलं ‘हे’ खास कारण!

पत्नीला किस करायला गेला अन् पँटच आली खाली, नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या आठच दिवसानंतर नववधूने सासरच्यांना लुटलं अन्…

तिसरी लाट भंयकर काळजी घ्या, सरकार तुमच्यासोबत- नितीन राऊत

लग्न पार पडताच नवऱ्याचा हात लावून घेण्यास नवरीचा नकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More