Top News मनोरंजन

रानू मंडलच्या नशिबी पुन्हा आले पूर्वीचेच दिवस

मुंबई | पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशन गाणं गाऊन आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या रानू मंडल यांचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांंगलाच व्हायरल झाला. त्या एका व्हिडीओमुळे रानू मंडल यांंना बॉलिवूड सिनेमासाठी गाणं गाण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध गायक हिमेश रशमियाने रानू मंडलसोबत एक गाणं गायलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना आता पहिले दिवस आले असल्याची माहिती मिळत आहे. रानू मंडल यांना पूर्वीचं जीवन जगावं लागतंय. त्यांनी स्टार झाल्यानंतर आपल्या चाहत्यांना दिलेल्या वागणूकीचा हा परिणाम असल्याचंही बोललं जातंय.

काही काळापूर्वी रानू मंडल यांनी एका चाहतीला सेल्फी न देता तिच्यावर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून चांगलीच टीकेची झोड उठवली होती.

दरम्यान, बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्या त्याच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ‘या’ कार्यकर्त्याला राष्ट्रवादी देणार मोठी संधी?

15 ते 20 आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा

महत्वाच्या बातम्या-

अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार नाही; टाकलं मोदींच्या पावलावर पाऊल!

“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”

भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या