राणू मोंडल झळकणार ‘या’ सुपरस्टारसोबत, नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई | रेल्वे स्थानकावर ‘एक प्यार का नगमा है’ गाणं म्हणणारी महिला सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाली. एका व्हायरल व्हिडीओमुळे कमालिची प्रसिद्धी मिळवलेली राणू मोंडल (Ranu Mondal) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
राणू मोंडल आता एका नव्या व्हिडीओसोबत परतली आहे. राणू मोंडल आणि आणि बांगलादेशी सुपरस्टार आलोम (Superstar Aalom) यांचं नवं गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुपरस्टार आलोमने या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला असून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहे.
आलोम बांगलादेशमधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुपरस्टार आलोमने राणू मोंडलसोबत काम करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आलोमने काही दिवसांपूर्वी ‘तुमी चारा अमी’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, राणू मोंडल आणि आलोम दोघंही या व्हिडीओत लाल रंगाचे कपडे परिधान करून एका स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तर काही नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे राणू मोंडलाला ट्रोल केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘ते’ वक्तव्य संजय राऊतांच्या अंगलट येणार?, न्यायालयात याचिका दाखल
“मंत्री धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग”
धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा अर्धवटराव म्हणून उल्लेख, म्हणाले…
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
“पक्षप्रमुख आदेश देतील आणि ईट का जवाब पत्थरसे दिया जायेगा”
Comments are closed.