“आज पहिल्यांदाच एका माशीने मला डंख मारला”, ब्रेकअपबद्दल रणवीरचं सूचक ट्विट

मुंबई | दीपिका-रणवीरचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये आहेत. या चर्चांना दुजोरा देणारं ट्विट अभिनेता रणीर सिंहनं केलंय. 

‘पद्मावती’च्या थ्रीडी ट्रेलर लाँच सोहळ्याला आमंत्रण नसताना दीपिकानं हजेरी लावल्याचं बोललं जातंय. याची पुसटीही कल्पना तीनं अभिनेता रणवीर सिंह आणि शाहीद कपूर यांना दिली नाही. त्यामुळे रणवीर संतापल्याचं कळतंय. 

दरम्यान, पद्मावती सिनेमातील रणवीरच्या भूमिकेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दीपिकाचा जळफळाट झाल्याचं कळतंय. दुसरीकडे “माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस, आय अॅम डन” असं ट्विट करत या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजारोच दिलाय असं म्हणावं लागेल.