“पण मी पळून गेलेलो…”, पहिल्यांदाच समोर येत रणवीर अल्लाहाबादियाने सर्व सांगितलं

Ranveer Allahbadia | मशहूर यूट्यूबर रणवीर अल्लाहाबादिया (Ranveer Allahbadia) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, त्याचा फोन बंद असल्याने मुंबई पोलिसांना तो सापडत नाही. दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्याने इन्स्टाग्रामवर एक नवीन संदेश शेअर करत पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्याने जाहीर कबुली देत आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

रणवीर अल्लाहाबादियाचा नवा संदेश

रणवीरने (Ranveer Allahbadia) इन्स्टाग्रामवर लिहिले, “माझी टीम आणि मी पोलिसांसह सर्व अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. मी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडणार असून, संबंधित यंत्रणांना उपलब्ध राहणार आहे. माझे पालकांबद्दलचे विधान असंवेदनशील आणि अनादरयुक्त होते. मला माझी नैतिक जबाबदारी ओळखून चांगले वागण्याची गरज आहे आणि मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Allahbadia (@beerbiceps)

पुढे तो म्हणाला की, मी पळून गेलेला नाही, पण भीतीत आहे. “मी अनेक धमक्या पाहत आहे, लोक मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याची भाषा करत आहेत. काही लोक माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये रुग्ण बनून पोहोचले आहेत. मी खूप घाबरलो आहे आणि काय करावे हे समजत नाही. पण मी पळून जात नाही. मला भारताच्या पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,” असे त्याने स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांचा शोध मोहीम सुरूच

शनिवारी, पीटीआयच्या अहवालानुसार, मुंबई पोलिसांना रणवीरचा ठावठिकाणा लागत नसून त्याचा फोन अजूनही बंद आहे. तसेच, पोलिसांनी कॉमेडियन समय रैना (Samay Raina) याला या प्रकरणी 10 मार्चपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये रणवीरने (Ranveer Allahbadia) केलेल्या पालक व लैंगिक संबंधावरील आक्षेपार्ह विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक लोकांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील खार पोलिसांनी रणवीरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद असल्याने ते अपयशी ठरले.

समय रैनाच्या वकिलाने पोलिसांकडे अधिक वेळ मागितला, कारण समय सध्या अमेरिकेत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्याला 10 मार्चपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याची मुदत दिली आहे.

याआधी रणवीरने स्वतःच्या निवासस्थानीच आपला जबाब नोंदवण्याची विनंती पोलिसांना केली होती, परंतु पोलिसांनी त्याला नकार दिला. शुक्रवारी पोलिस त्याच्या वर्सोवा (Versova) येथील फ्लॅटवर गेले, मात्र तो बंद असल्याचे आढळले.

पोलिसांचा तपास आणि पुढील कारवाई

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अपूर्व मुखिजा (Apoorva Mukhija), आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि रणवीरचा मॅनेजर यांच्यासह आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, अद्याप या संदर्भात कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणात सहभागी झालेल्या किमान 50 लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. या यादीत शोमध्ये सहभागी असलेल्यांचाही समावेश आहे.

याच चौकशीच्या अनुषंगाने गुरुवारी अभिनेते आणि निर्माते रघु राम (Raghu Ram) यांनी आपला जबाब नोंदवला. ते या शोमध्ये परीक्षक होते. सध्या पोलिस तपास वेगाने सुरू असून रणवीर अल्लाहाबादियाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

News Title :  Ranveer Allahbadia Responds Amid Mumbai Police Search

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .