बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

मुंबई | बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूड (Bollywood) मधील सर्वात चर्चेत असलेलं जोडपं (Couple) आहे. रणवीर-दीपिकाने नुकतंच वांद्र्याच्या (Bandra) उच्चभ्रु ठिकाणी एक नवीन घर खरेदी केले आहे. कोट्यवधींचा खर्च करत रणवीर-दीपिका आलिशान अशा क्वाड्रुप्लेक्स अपार्टमेंटचे मालक झाले आहेत

रणवीर आणि दीपिकाने रेसिडेंशियल टॉवर सागर रेशम येथे हे घर खरेदी केले आहे. या नवीन घरातून समुद्राचा (Sea Face) सुंदर असा देखावा दिसतो. तर या घराची किंमत तब्बल 119 कोटी रुपये असून हे घर देशातील सर्वात महागड्या व्यवहारातील एक म्हणून म्हटलं जात आहे.

या ठिकाणी 1 लाख रुपये प्रती चौरस फूट (Per Square Foot) असा भाव सुरु आहे. रणवीरने हे घर ओह मिडीया वर्क्स एलएलपीच्या माध्यमातून खरेदी केले आहे. तसेच या व्यवहारासाठी रणवीरने 7.13 कोटी रुपयांची स्टँप ड्यूटी अदा केली आहे.

दरम्यान, ही इमारत सलमान खानच्या (Salman Khan) गॅलॅक्सी अपार्टमेंट आणि शाहरुख खानच्या (Shaharukh Khan) मन्नत बंगल्याच्या मधोमध आहे. त्यामुळे आता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सलमान खान आणि शाहरुख खान यांचे शेजारी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका, देशमुखांच्या जामीनाला आणखी एकदा नकार

शिंदे गट विरूद्ध शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या यू-टर्ननंतर उद्धव ठाकरे आक्रमक, केली ‘ही’ मोठी कारवाई

गोव्याच्या राजकीय वातावरणात बिघाड, सोनिया गांधींनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘नामांतराविषयी आमच्याशी चर्चा झाली नाही’, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More