बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूड फोटोशूट प्रकरणात रणवीर सिंग स्पष्टच बोलला

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) मागील काही दिवसांत चर्चेच्या केंद्रस्थानी होता. त्याने पेपर मॅगझिनसाठी (Paper Magazine) न्यूड फोटोशूट केले होते. त्यानंतर त्याच्यावर सर्व स्तारांतून टीका झाली होती.

यानंतर चेंबूर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार झाली होती. त्याच्याविरोधात भादंवि कलम (Indian Penal Code)  292, 293 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणात त्याची पोलिसांनी दोन तास चौकशी केली.  मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट केले. मला चांगले कपडे घालायला आणि छान छान खायला आवडते. मी दिवसातील वीस तास काम करतो, पण त्याची कधी तक्रार करत नाही. तरीही माझ्याबद्दल उलटसुलट बोलत असेल तर त्याची मी पर्वा करत नाही, असे रणवीर सिंग म्हणाला.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More