बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मॅगझीनसाठी रणवीर सिंग झाला विवस्त्र, न्यूड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो

मुंबई | बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा चित्रविचित्र काहीतरी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो सतत प्रेक्षकांना आकर्षक असे काहीतरी करत असतो. त्यामुळे तो सतत चर्चेत देखील असतो. आता फोटोशूटसाठी (Photo shoot) तो चक्क विवस्त्र झाला आहे. त्यामुळे आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पेपर मॅगझीनसाठी त्याने फोटोशूट केले आहे. त्याचे विवस्त्रावस्थेतील फोटो सध्या समाज माध्यमांवर धुमाकुळ घालत आहेत. त्याच्या या अजब फोटोंमुळे काहींनी त्याच्यावर टीका केली आहे तर काहींनी त्याचे कौतुक केले आहे.

रणवीर सिंगपूर्वी अभिनेता मिलिंद सोमन (Milind Soman) यांनीही असेच न्यूड फोटोशूट केले होते. Ranveer Singh: The last Bollywood Superstar या मथळ्याखाली पेपर मॅगझीनने (Paper Magazine) रणवीर सिंग याच्याबद्दल माहिती आणि फोटो पोस्ट केले आहेत.

रणवीर सिंग याने Paper Magzine Website च्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट (Nude Photo Shoot) केले आहे. या फोटोशूटमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश (Turkish) गालिच्यावर विविध पोज देत असताना दिसत आहे. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या (Jo Bert Reynold) कव्हरपासून प्रेरीत आहेत. पेपर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या चित्रपट आणि फॅशन विषयी सांगितले.

रणवीर म्हणाला, शारीरीक रुपाने न्यूड होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. तुम्ही माझा आत्मा पाहू शकता, तो किती नग्न आहे? मी हजारो लोकांसमोर नग्न होऊ शकतो, त्याने मला काही फरक पडत नाही. फक्त मला पाहून अस्वस्थ होतात, असे रणवीर सिंग म्हणाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

अंबादास दानवेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…

राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च

ओबीसी आरक्षणाचे आम्हीच जनक! भाजप-शिवसेनेत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!

“चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More