मॅन्चेस्टर | विश्वचषकात सलग सातव्यांदा भारताने पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याला आपले अश्रू अनावर झाले. सामन्यावेळी मैदानावर उपस्थित असलेला अभिनेता रणवीर सिंगने त्या पाकिस्तानी चाहत्याचे अश्रू पुसले.
मॅन्चेस्टरच्या मैदानात रविवारी भारत विरूद्ध पाकिस्तान हा महामुकाबला पार पडला. यावेळी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी रणवीर सिंग याने हजेरी लावली होती.
भारताने पाकिस्तानचा पराभव केल्याने पाकिस्तानचे चाहते चांगलेच निराश झालेले पाहायला मिळाले. या चाहत्यांचे व्हीडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
रणवीर सिंग आपल्या उदार व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. त्याने या सामन्यावेळी देखील आपला हाच स्वभाव जपत निराश झालेल्या चाहत्याचे अश्रू पुसले.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या
-काही बरे-वाईट झाले तर त्याला शिवेंद्रराजेच जबाबदार राहतील!
-पठ्ठ्याने एका डावात लगावले 17 गगनचुंबी षटकार
-पुणेकरांनो हेल्मेटसक्ती कायम आहे; फक्त रस्त्यावर दंडवसुली होणार नाही!
-वाढत्या बेरोजगारीने तरूणाई त्रस्त; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रेल रोको आंदोलन
-धनंजय मुंडे अज्ञानी.. म्हणून तर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला; चंद्रकांत पाटलांची टीका
Comments are closed.