दीपिकाच्या लाइव्ह सेशनमध्ये रणवीरची भलतीच डीमांड, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | बाॅलिवूडमधील(Bollywood) लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रणवीर-दीपिका(Ranveer Singh-Deepika Padukone). या जोडीचे सगळेच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या जोडीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. या दोघांविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

खऱ्या आयुष्यातही ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत असल्याचं दिसून येतं. रणवीरनं अनेक शोदरम्यान तसेच पुरस्कार सोहळ्यांत दीपिकावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच दीपिकाही रणवीरची तारीफ करण्याची एक संधी सोडत नसते.

त्यातच आता रणवीर-दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. झालं असं की, दीपिकानं एक प्रोडक्ट लाॅंच करताना लाइव्ह सेशन केलं होतं. या सेशनमध्ये दीपिका बोलत असताना रणवीरनं कमेंट्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

रणवीरनं कमेंट केली होती की, आम्हालापण स्किन केअर विषयी माहित करून घ्यायचं आहे. आम्हीपण चेहऱ्यावर माॅश्चरायजर लावतो, स्वत:ची काळजी घेणं चांगली गोष्ट आहे. पुढं त्यानं रोमॅन्टिक मूडमध्ये येत असंही लिहिलं की, तुझ्या नरम हातांनी माझ्या चेहऱ्यावर ते माॅयश्चरायजर लाव.

आता रणवीरनं केलेल्या या कमेंट्सवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळं सध्या या जोडप्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याची दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More