फोटो व्हायरल; पहा कुणासोबत रणवीर करतोय ‘खली बली’!

मुंबई | पद्मावत चित्रपटातील ‘खली बली’ हे गाणं बरंच लोकप्रिय झालं. मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात याच गाण्यावर अभिनेता रणवीर सिंग मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत थिरकताना दिसला

प्रत्येक वेळी एक चांगली गोष्ट पॅकेजच्या रुपात येते आणि माझ्यासाठी हे पॅकेज रणवीर सिंग आहे. तुमच्यापासून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला तुमचा स्वभाव फार आवडतो,” असं अमृताने ईंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कनर्वजन-2018 या कार्यक्रमात रणवीर सिंग प्रमुख परफॉर्मर म्हणून उपस्थित होता.