महाराष्ट्र मुंबई

माझा जावई माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचही ऐकत नाही- रावसाहेब दानवे

मुंबई | जावई हर्षवर्धन जाधव माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचही ऐकत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही9’ च्या ‘न्यूजरूम स्ट्राईक’ या कार्यक्रमात बोलत होते.

हर्षवर्धन जाधवांना निवडणूक लढवू नका, असं सांगितलं होतं पण त्यांनी माझं ऐकलं नाही. एवढचं नाहीतर मी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरेंना देखील माझ्या जावयाला समजवून सांगायला लावलं होतं. पण जावयाने त्यांचंही ऐकलं नाही, असं दनवेंनी सांगितलं आहे.

हर्षवर्धन जाधवांच स्वत:च साम्राज्य आहे. त्यांच्या अनेक पिढ्या राजकारणात आहेत, त्यामुळे त्यांना माझ्या मदतीची गरज नाही, असं दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जावयाचा छुप्या पद्धतीने प्रचार करून युती धर्म न पाळल्याचा आरोप औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

-‘जय श्रीराम’च्या घोषणा भारतात नाहीतर पाकिस्तानात द्यायच्या का?; अमित शहांचा ममतादीदींना सवाल

-काँग्रेसने साधू संतांना त्रास देणं बंद करा; साध्वी प्रज्ञा

-बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

-मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला मतदारांनी पंतप्रधान पदावर बसवू नये- प्रकाश आंबेडकर

-‘मुंगेरीलाल के हसीन सपने’; भाजपने व्हीडिओ शेअर करुन उडवली पवारांची खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या