पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

शरद पवार प्रचाराची पातळी खाली घेऊन गेलेत- रावसाहेब दानवे

पुणे | शरद पवार यांनी आजवर अनेक निवडणूक पहिल्या आहेत. मात्र, काल झालेल्या एका प्रचार सभेत, शरद पवार यांनी, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. हे पाहता ते प्रचाराची पातळी, खाली घेऊन गेले आहेत. अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी बाणेर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते.

सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि गुलाब नबी आझाद या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जन्म एका ठिकाणी आणि उमेदवारीसाठी ते दुसर्‍या ठिकाणी उभे राहतात. ही परंपरा काँग्रेस पक्षाने आणली असून चंद्रकांत पाटील, तर आपल्यातील असल्याचे सांगत, बाहेरचा उमेदवार म्हणणार्‍यांना त्यांनी टोला लगावला.

राज्यात निवडणुकीचा प्रचार सुरू असून प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या