औरंगाबाद | जिल्हा परिषदेतल्या काँग्रेस-शिवसेना युतीबाबत अविश्वास ठराव आणा, मी शिवसेनेची हमी घेतो, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिलं. विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेने जाणीवपूर्वक भाजप सदस्यांना विकासनिधी उपलब्ध करून न दिल्याने आमच्या गटात कामं झाली नाहीत. त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याचं गाऱ्हाणं विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजप सदस्यांनी दानवेंसमोर मांडलं. यानंतर दानवेंनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष जोमाने तयारीला लागलेत. दानवेंनीही रविवारी जालना, औरंगाबादमध्ये 2 बैठका घेतल्या.
दरम्यान, या मतदारसंघासाठी 19 ऑगस्टला मतदान पार पडेल तर 23 ऑगस्टला मतमोजणी होईल.
महत्वाच्या बातम्या-
-या भाजप आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का???”
-गाफील अधिकाऱ्यांवर 3 दिवसात कारवाई करणार- गिरीश महाजन
-राज ठाकरेंच्या वक्तव्याशी नारायण राणे सहमत?; म्हणतात…
-ज्यांनी किल्लारी उभं केलं त्या प्रवीण परदेशींकडे सांगलीची जबाबदारी!
Comments are closed.