बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झाली”

मुंबई | केंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतींमध्ये, महाराष्ट्र राज्याला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना दानवेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरलं आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही, तेव्हा आघाडी सरकारने त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकारवर दोषारोप सुरू केले असल्याचे आरोप दानवे यांनी केला आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मॅट्रीक टन ऑक्सिजन दिले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे. जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड्स येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील असं दानवे म्हणाले.

दरम्यान, 25 एप्रिल रोजी रुग्णालयांना ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या मोदींच्या निर्देशानुसार पीएम केअर्स फंडाने देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील 551 समर्पित प्रेशर स्विंग अडसोर्पशन (पीएसए) मेडिकल ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला मान्यता दिली असल्याचं दानवेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

परमबीर सिंहांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा पत्राद्वारे गौप्यस्फोट

पुणेकरांच्या मदतीसाठी धावला हरभजन सिंग, केली ‘ही’ लाखमोलाची मदत

मोठी बातमी! सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

“आयपीएल खेळणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो… तुम्हीही भारताला मदत करा”

“आता लोकांनी घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More