उंदरांची फौज तयार करुन मला भीती दाखवू नका, मी वाघ आहे!

औरंगाबाद | उंदरांची फौज तयार करुन मला भीती दाखवू नका, मी वाघ आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांना आव्हान दिलं आहे. ते सिल्लोडमध्ये बोलत होते. 

अब्दुल सत्तार यांनी खासदारकीसाठी दानवेंच्या विरोधात अर्जुन खोतकरांना पाठिंबा दिला आहे. यावर 200 मतांनी निवडून आलेले खोतकर मला काय पाडणार?, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी विचारला. 

सिल्लोडमध्ये पुढचा आमदार भाजपचा असेल, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.