Top News राजकारण

“मी आणि माझं कुटुंब म्हणत मुख्यमंत्री मात्र घरातच बसलेत”

पैठण | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. ‘मी आणि माझे कुटुंब’ असे म्हणत घरातच बसलेत अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, महा विकास आघाडीचं सरकार हे अमर, अकबर, अँथनीप्रमाणे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी राज्यात दौरे करतायत. मात्र ‘मी आणि माझे कुटुंब’ म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसलेत.

सध्या कोरोनाच्या काळात तसंच अतिवृष्टीच्या काळात राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा द्यायला हवा, असंही दानवे यांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू

“बाळासाहेबांचा वारस असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…”

कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही- अमित शहा

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलंय, यांना मुंबईची चिंता नाही- प्रवीण दरेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या