नवी दिल्ली | शिवसेना पक्षातील बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मोठी शाब्दिक आणि कायदेशीर लढाई सुरु आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाने दावा केला आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असं देखील म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडोबांना माझ्या वडिलांचा फोटो वापरु नका, तसेच शिवसेनेचे नाव घेऊ नका, असा इशारा दिला होता. तसेच तुमचे आईवडिल जीवंत आहेत ना, त्यांचे फोटो वापरून मते मागा आणि निवडणूका जिंका असेही आव्हान केले होते. शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे जरी उद्धव ठाकरे यांचे वडिल असले, तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेेते होते. महाराष्ट्राचा राजा माणूस म्हणून त्यांना देश ओळखतो. राजाच्या पोटी आपण जन्माला आलो, म्हणून आपण राजा झालो, असं समजू नका. कारण राजा कोणाच्या पोटी आल्याने नाहीतर मतपेटीतून ठरत असतो, असं रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंना म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांच्या आव्हनाला आता शिंदे गटातील बंडखोर आमदार उत्तरे देत आहेत. उद्धव ठाकरे आता सतत त्यांना तेच तेच आव्हान करत असल्याने रावसाहेब दानवे यांनी या वादात उडी घेत आपलं मत सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर!
मोठी बातमी! दीपाली सय्यद दिल्लीत अमित शहांची भेट घेणार
शरद पवारांनी शिवसेना संपवली?, उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले…
“नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात”
‘सत्तेत असो किंवा नसो अजित पवार नेहमी…’, अनिल बोंडेंची बोचरी टीका
Comments are closed.