Top News पुणे महाराष्ट्र

‘…तर भाजपच्या विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पुणे | राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्ता जागा मिळूनही विरोधी पक्षात बसावं लागलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सरकार स्थापन केलं. त्यामुळे या गोष्टीची सल कायम भाजपच्या मनात राहणार आहे.

भाजपचा राज्यातील सर्वात मोठी मित्रपक्ष शिवसेनेने साथ सोडली. मात्र अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोणावळ्यात ते बोलत होते.

आपण स्वबळावर लढलो असतो तर विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या. त्यामुळे पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायची तयारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी करावी, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप पक्षाचा मूळ पिंड विरोधी पक्षाचा आहे. बहुमत युतीला मिळालं पण आपल्या मित्राने धोका दिला. मोदींच्या नावाने मतं मागितली याचा त्यांना विसर पडला असल्याचं म्हणत दानवेंनी शिवसेवेवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

ऑस्ट्रेलियामध्ये सिराज आणि बुमराहच्या अपमानावर किंग कोहली भडकला; म्हणाला…

तुम्ही मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क यांना विकले गेले आहात- कंगणा राणावत

“शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे”

‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा

“ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या