पुणे | महाविकास आघाडी सरकारने राज्यातील विरोधी पक्ष आणि इतर पक्षातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा कपात करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब यांचाही समावेश आहे. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही. आमचं संरक्षण या राज्यातली जनता करते. त्यामुळे सुरक्षा हटवली तर आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ असं होणार नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
पोलीस संरक्षण देते तेव्हा ते सरकार देत नसते. यासाठी सरकारने नेमलेली एक समिती असते. ती समिती आढावा घेते. मग यांना काही धोका आहे का?, याचा अहवाल पोलीस देते, मगच संरक्षण मिळतं असल्याचं दानवेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी मरठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषय हा सरकारने क्लिष्ट करून टाकला असल्याचं दानवे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे तर….’; शरद पवारांची गुगली
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून पुन्हा वर्णद्वेषी टीका, खेळ थांबवण्याची आली वेळ, पहा व्हिडीयो
सेक्स पोजिशन ट्राय करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण