मुंबई | राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या राजकीय वातावरण तापलं असताना महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे.
शिवसेनेनं (Shivsena) सहाव्या जागेवर दावा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यसभेवर जायचं असेल तर हातात शिवबंधन बांधा, अशी ऑफर शिवसेनेने संभाजीराजेंना दिली. यावर भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेला शिवबंधन बांधलेला माणूस लागतो. शिवबंधन बांधायचं आणि अडकून टाकायचं हे त्यामागचं सूत्र आहे, असा टोला दानवेंनी लगावला. संभाजीराजेंना शिवबंधन बांधायचं असेल तर शिवसेनेनं संभाजीराजेंना सहावी नाही तर संजय राऊतांची सेफ जागा द्या, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी शिवसेनेची कोंडी केली आहे.
दरम्यान, भाजपने (BJP) सहाव्या जागेचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं देखील रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे. तर संभाजीराजेंना सन्मानपूर्वक राज्यसभेवर पाठवायचं असेल तर त्यांना फर्स्ट जागा द्या, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
नवनीत राणांचा मुंबई पोलिसांना थेट इशारा, म्हणाल्या…
संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…
Weather Update | पुढील 5 दिवस ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो…”
सर्वसामान्यांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.