बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेंबड्या पोरानं केंद्रीय मंत्र्याला ठोकलं’; लेकाचं कौतुक करत हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना टोला

औरंगाबाद | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पत्नी संजना जाधव यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच आपल्या मुलाचं तोंडभर कौतुक देखील केलं आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी एका आयोजीत सभेत जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमात जाधवांनी नेहमीप्रमाणे सासऱ्यांना टोले लगावले आहेत. बाप जेलमध्ये असताना पोरगा उठून उभा राहिला. संपुर्ण मतदारसंघ काबीज करण्याचा यांचा प्रयत्न होता. पण शेंबड्या पोरानं केंद्रीय मंत्र्याला ठोकला. हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारचं म्हणा, असं म्हणतं हर्षवर्धन जाधव यांनी मुलगा आदित्यचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधव यांनी पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल उभं केलं होतं. पण संजना जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवनं आपल्या आईच्या विरोधात पॅनल उभा केलं. आपल्या वडिलांच्या नावानं अधिकृत पॅनल घोषित केलं होतं. परंतू या दोन्ही पॅनलचा महाविकास आघाडीने पराभव केला होता. आदित्याच्या या धाडसाबद्दल त्याचं कौतुक केलं गेलं.

हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता. परंतू मुलासाठी ते पुन्हा राजकारणात उतरले आहेत, असं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! भररस्यात घडलेल्या ‘या’ घटनेनं पुणे हादरलं

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्कार प्रकरणात अटक

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More