मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं ‘हे’ वक्तव्य
मुंबई | महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेले निर्बंध हटवले जात आहेत. हे करत असताना अनेक स्तरातुन मागणी होत असताना ही मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात सरकार अजुन सावधगिरीच बाळगत आहे. राज्य सरकारने नुकतेच 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथील करत असल्याचं जाहीर केलं आहे. पण यात लोकलबाबत कसलाही निर्णय घेतला गेला नाही.
लोकलबाबत लोकांच्या मागण्यांचा विचार करुन राज्यसरकारने तयारी दाखवणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने नुकतेच निर्बंध शिथिल केले आहेत, याचाच आधार घेत दानवे बोलत होते. पुढे ते म्हणाले की, राज्यसरकारने जर विनंती केली तर आम्हाला लोकल सुरू करण्यास काहीही हरकत नाही.
राज्य सरकार यावर आपली भुमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आम्ही यात कसलाही हस्तक्षेप करू शकत नाहीत. कारण कोरोना परिस्थितीबाबत अंतिम निर्णय हा राज्य सरकारच घेत असतं. ज्या दिवशी राज्य सरकार विनंती करेल की कोरोनाची स्थिती आता आटोक्यात आली आहे, लोकल सुरू करा, आम्ही लोकल लगेच सुरू करू, असंही ते यावेळी म्हणाले.
राज्य सरकारवर टीका करण्याची संधी सुध्दा दानवे यांनी यावेळी सोडली नाही. राज्य सरकार नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारने सामान्य नागरिकांना प्रवासासाठी सुलभतेचा व त्यांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर लोकलबाबत निर्णय घ्यावा, असंही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या
प्रशांत किशोर यांनी दिला मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा!
7 मुलांच्या 67 वर्षीय बापाने केला 19 वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह, केली ‘ही’ मागणी
‘झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका’; आरोग्यमंत्री राजेश टोपेेंचं जनतेला आवाहन
“ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून संपले, हा या देशाचा इतिहास”
“जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय”
Comments are closed.